अध्यक्ष चंद्रशेखरन यांचे आर्थिक वर्ष 23 मधील वेतन : नफ्यावरील कमिशन 100 कोटी रुपये
मुंबई
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना 2022-23 (आर्थिक वर्ष 23) आर्थिक वर्षासाठी 113 कोटी रुपये मोबदला म्हणून देण्यात आले होते, ज्यामध्ये नफ्यावर कमिशन म्हणून 100 कोटी रुपये समाविष्ट करण्यात आले आहेत. 60 वर्षीय चंद्रशेखरन यांना आर्थिक वर्ष 22 मध्ये 109 कोटी रुपये मानधन देण्यात आले.
टाटा समूहाची कंपनी टाटा सन्सच्या वार्षिक अहवालानुसार, कार्यकारी संचालक सौरभ अग्रवाल यांना 27.82 कोटी रुपये मानधन देण्यात आले, ज्यामध्ये 22 कोटी रुपयांच्या कमिशनचा समावेश आहे. वेणू श्रीनिवासन यांनी 2016 पासून एकही पैसा घेतलेला नाही. टीव्हीएस समूहाचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांना 2016 मध्ये त्यांची बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाल्यापासून टाटा सन्सकडून एकही पैसा मिळालेला नाही. पिरामल समूहाचे मालक अजय पिरामल यांना टाटा सन्सचे बिगर कार्यकारी संचालक म्हणून आर्थिक वर्ष 23 मध्ये 2.8 कोटी रुपये मानधन देण्यात आले.
टाटा सन्सच्या अन्य संचालकांचे वेतन
टाटा सन्सच्या इतर संचालकांमध्ये विजय सिंग, हरीश मनवानी, लिओ पुरी, भास्कर भट्ट आणि राल्फ स्पेथ यांना कमिशनच्या रूपात आर्थिक वर्ष 23 साठी प्रत्येकी 2.8 कोटी रुपये मोबदला देण्यात आला. जुलै 2022 मध्ये स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त झालेल्या अनिता जॉर्ज यांना 2.1 कोटी रुपये मानधन देण्यात आले.









