उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने यावर्षी दुसऱ्यांदा किंमती वाढविल्या
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोटर्स 1 मे 2023 पासून त्यांच्या प्रवासी वाहनांच्या (पीव्ही) किमतीत वाढ करणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी कंपनीने घोषणा केली. त्याचे सर्व प्रकार आणि मॉडेल्सच्या किमती सरासरी 0.6 टक्क्यांनी वाढणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत.
या वर्षी दुसऱ्यांदा पीव्ही दरवाढीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता टाटा मोटर्सची कार घ्यायची असेल तर त्यामध्येही थोडी स्वस्त कार घेण्यासाठी फक्त 30 एप्रिलपर्यंत म्हणजे 15 दिवसच बाकी राहिले आहेत. यानंतर कंपनीच्या सर्व गाड्या महाग होणार आहेत. फेब्रुवारी 2023 नंतर कंपनीने या वर्षी दुसऱ्यांदा आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
टाटा मोटर्सनेही कारणे दिली
कंपनीने माहिती दिली आहे की नवीन नियामक बदल आणि एकूण कार बनवण्याच्या खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून व्यावसायिक वाहनांच्या किमती 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
यापूर्वी, टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 1 एप्रिलपासून 5टक्क्यांनी वाढवल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये, टाटाच्या सर्व प्रवासी वाहनांसाठी सरासरी 1.2टक्के दरवाढीची घोषणा केली होती.









