मुंबई :
टाटा कॅपिटल ही वित्तसेवा क्षेत्रातील कंपनी आपला आयपीओ आणणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 17 हजार कोटी रूपये उभारणार असल्याची माहिती आहे. एनसीएलटी यांची मंजूरी मिळताच टाटा कॅपिटल आयपीओकरीता बाजारातील नियामक सेबीकडे आपला रितसर अर्ज दाखल करणार आहे.
या आयपीओ नंतर कंपनीचे एकंदर मूल्य 11 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल असा अंदाज वर्तविला जात आहे. बिगर बँकींग क्षेत्रातील ही कंपनी असून आयपीओ करीता संचालक मंडळाने मंजुरी दिलेली आहे. आयपीओ अंतर्गत 2.3 कोटी ताजे समभाग सादर केले जाणार असल्याची शक्यता सांगितली जात आहे.
दुसरी कंपनी
टाटा समुहातील टाटा कॅपिटल ही आयपीओ सादर करणारी दुसरी कंपनी असणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीज या कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता.









