प्रीमीयम हॅचबॅक प्रकारातील कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझ कारचे आयसीएनजी मॉडेल लाँच केले आहे. ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही देशातील पहिली कार आहे. टाटा अल्ट्रोज आयसीएनजीची सुरुवातीची किंमत 7.55 लाख (एक्स-शोरूम) आहे.
आयसीएनजी मॉडेलमध्ये व्हॉइस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जर आणि एअर प्युरिफायर यासारखी अनेक प्रगत वैशिष्ट्यो आहेत.
टाटा अल्ट्रोज आयसीएनजी 6 प्रकारांमध्ये असून यामध्ये एक्सइ, एक्सएम प्लस, एक्सएमप्लस एस, एक्सझेड, एक्सझेड प्लस एस आणि एक्स झेड प्लस ओ एस मध्ये ऑफर करण्यात येणार आहे. ही कार ऑपेरा ब्लू, डाउनटाउन रेड, आर्केड ग्रे आणि अव्हेन्यू व्हाईट या चार रंगामध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.









