ऑनलाईन टीम / लंडन :
टाटा ग्रुपच्या जॅग्वार, लॅन्ड रोव्हर आणि टाटा स्टील या कंपन्यांना सरकारी बेलआउट पॅकेज देण्यास ब्रिटनने नकार दिला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोनामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फाटका बसला आहे. त्यामुळे ब्रिटनने टाटा कंपन्यांना सरकारी बेलआउट पॅकेज नाकारले आहे. लॉकडाऊन काळात टाटा ग्रुपच्या या कंपन्याही सध्या आर्थिक अडचणीत आहेत. टाटा ग्रुपची ब्रिटन सरकार सोबतची चर्चा थांबली आहे. त्यामुळे टाटा ग्रुपला आता खासगी फायनान्सवर अवलंबून रहावे लागणार आहे.
दरम्यान, जेएलआरचे प्रमुख राल्फ स्पेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेथील प्रमुखांचा पगार 30 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यांचा पगार 2.5 अब्ज पौंडांपर्यंत वाढवला आणि हजारो नोकऱ्या कमी केल्या. मागील चार वर्षांत राल्फचे एकूण उत्पन्न 18 लाख पौंड होते.