नवी दिल्ली :
प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन या भारतात राहत आहेत. परंतु आता त्यांच्या भारतातील वास्तव्यावरून नवा पेच निर्माण झाला आहे. त्यांची भारतातील वास्तव्याची अनुमती जुलै महिन्यात संपुष्टात आली होती. वास्तव्य परवान्याचे अद्याप नुतनीकरण झालेले नाही. तस्लीमा या धार्मिक कट्टरवाद्यांच्या कठोर टीकाकार आहेत, अशा स्थितीत भारतात वास्तव्याची अनुमती मिळाली नाही तर जीवाला धोका निर्माण होईल असे त्यांचे सांगणे आहे. तस्लीमा यांनी भारत सरकारला वास्तव्य परवान्याचे नुतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे. तस्लीमा आता स्वीडिश नागरिक असून 2011 पासून भारतात राहत आहेत. वास्तव्य परवान्यासंबंधी शासकीय अधिकाऱ्यांकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.









