सांगली/ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिप्रेत असणाऱ्या राज्याची संकल्पना ठाकरे सरकार राबवत असल्याचे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. आज ते सांगलीत नवहिंद प्रतिष्ठानच्या धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पुतळ्याचे पूजन केले.
सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला कारभार सरकार करत आहे. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेविका अॅड. स्वाती शिंदे, बजरंग पाटी, माजी जिल्हाप्रमुख सुनिता मोरे, शहर प्रमुख महेंद्र चंडाळे, मयूर घोडके, हरिदास लेंगरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर, जिल्हाप्रमुख संजय विभूते, सुजाता इंगळे शंभूराज काटकर दिगंबर जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.








