प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur : ‘तरुण भारत संवाद’ आयोजित ‘मी ऊर्जिता’ उपक्रमांतर्गत ‘तरूण भारत’ सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित स्पर्धेने स्त्री-पुरूष समानतेचा संदेश दिला. महिलांमधील आत्मविश्वास, दृढ निश्चयाची भावना व नित्य साथ नृत्यरूपाने आपल्या पुरूष साथीदारासोबत सादर करण्याची संधी दिली, असल्याचे मत स्पर्धेतील विजेत्यांनी व्यक्त केली. ‘स्त्री-पुरूष’ समानतेवर आधारीत ‘लेट्स डान्स’ स्पर्धेत वाचकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. नवी संकल्पना घेऊन आयोजित केलेल्या या स्पर्धारूपी उपक्रमाचे सहभागी स्पर्धकांसह वाचकांनी कौतुक केले.
‘तरुण भारत संवाद’च्या कार्यकारी संचालिका रोमा ठाकुर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
‘तरुण भारत संवाद’ने जागतिक महिला दिनानिमित्त नवसंकल्पना राबवत स्त्री-पुरुष समानतेवर ‘मी ऊर्जिता लेटस् डान्स’ स्पर्धेचे आयोजन केले हेते. या स्पर्धेतून ‘मिळू द्या दोन्ही हात, नित्य देऊ एकमेकांची साथ’ या उद्देशाने नृत्यकौशल्य आणि कला दाखविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी इतर स्पर्धकांचे व्हिडिओ तरुण भारतच्या डिजीटल मिडीयावर दाखविण्यात आले.
स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा ‘तरूण भारत संवाद’च्या दसरा चौकातील कार्यालयात बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. ‘तरूण भारत संवाद’चे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी स्पर्धेचे प्रायोजक अग्रवाल गोल्डचे सुशिल अग्रवाल व स्वर्ग ज्वेलर्सचे स्वरूपसिंह सोळंकी यांचे स्वागत केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सोशल मिडियाच्या प्रतिनिधी अर्चना बनगे यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा हेतू स्पष्ट केला. यावेळी राहुल अपराध, जाहिरात विभाग प्रमुख (शहर) मंगेश जाधव, सतिश देवस्थळी, अविनाश गायकवाड, शंतनू कोठावळे, शर्वरी वारंगे, रूपेश वारंगे उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते असे :
प्रथम क्रमांक : गीता देवस्थळी (इचलकरंजी)
द्वितीय क्रमांक : श्रद्धा शुक्ल (कोल्हापूर)
तृतीय क्रमांक : शितल राजेंद्र सोनकवडे (संभाजीनगर)
उत्तेजनार्थ : रश्मी कोठावळे (मलकापूर, ता. शाहूवाडी)
स्त्री- पुरूष समानतेला असेही पाठबळ
दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यंदा या दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार करणारा संदेश देण्यात आला आहे. ‘तरूण भारत संवाद’ने याच संकल्पनेतून मी उर्जिताच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री-पुरूष समानतेला पाठबळ देणारी स्पर्धा आयोजित केली. स्पर्धारूपी उपक्रमामुळे आत्मविश्वास व दृढ निश्चयाची उर्जा मिळाली असल्याचे गौरवोद्गार स्पर्धेतील विजेत्यांनी बक्षीस वितरण प्रसंगी काढले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









