कृषी पत्तीन संघाच्या सेक्रेटरीविरुद्ध एफआयआर
प्रतिनिधी /बेळगाव
‘तरुण भारत’चे अगसगे, ता. बेळगाव येथील वार्ताहर सुधीर केंचाप्पा गडकरी (वय 38) यांच्यावर बुधवारी दुपारी खुरप्याने हल्ला करण्यात आला आहे. त्याच गावातील कृषी पत्तीन सहकारी संघाच्या सेपेटरीने हे कृत्य केले असून त्याच्यावर काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कृषी पत्तीन संघाचे सेपेटरी रोहन अशोक पाटील याने हा हल्ला केला आहे. ‘यापुढे वृत्तपत्रात आपल्याबद्दल काही जरी छापून आले तर तुला संपवितो’, अशी धमकीही महाभागाने दिली आहे. रोहनविरुद्ध भादंवि 324, 504, 506 अन्वये एफआयआर दाखल केला आहे. ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक एस. बी. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली काकती पोलीस निरीक्षक गुरुनाथ आय. एस. व सहकारी तपास करीत आहेत.
हल्ला करणाऱयावर कडक कारवाईची मागणी
रेशन दुकानात धान्य वाटप करताना मापात पाप झाल्यासंबंधी सध्या संबंधित खात्याकडून चौकशी सुरू आहे. यासंबंधी ‘तरुण भारत’मध्ये बातमीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राग अनावर होऊन रोहन पाटील याने हा हल्ला केला आहे. पत्रकारावर हल्ला करणाऱयावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
बुधवार दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सुधीर गडकरी आपल्या रेशनकार्डवरील धान्य आणण्यासाठी या सोसायटीमार्फत चालविण्यात येत असलेल्या रेशन दुकानात गेले होते. रोहन पाटील धान्य वाटप करीत होता. त्यावेळी चांगले तांदूळ द्या. काल वितरित केलेल्या तांदळात रासायनिक खत आढळून आले आहे. अंगठा घेऊन धान्य द्या, असे सांगताच ‘मला शिकविणारा तू कोण?’ अशी विचारणा करीत अर्वाच्च शिवीगाळ करून रोहनने खुरप्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुधीर यांच्या डोक्मयाला दुखापत झाली असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.









