मयुर चराटकर
बांदा
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे टनेल मध्ये चिखलसदृश माती आल्याने मंगळवारी मध्यरात्री पासून सिंधुदुर्ग मार्गे वाहतूक बंद होती. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला होता. तब्बल सतरा तासानंतर रेल्वे रुळावर आलेला चिखल साफ करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असून रात्री ८.३५ मिनिटांनी व्हाया सिंधुदुर्ग मार्ग वाहतुकीस सुरू झाला आहे. चिखल हटविण्यासाठी तब्बल 200 कर्मचारी त्या टनेल मध्ये ठाण मांडून होते. तर रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्या कामावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे उद्या पासून होणारी रेल्वे वाहतूक व्हाया सिंधुदुर्ग होणार आहे.
Previous Articleकुंभेश्वर वळणावर डंपरचा अपघात
Next Article मुस्लीम महिलेलाही ‘पोटगी’चा अधिकार









