प्रतिनिधी
बांदा
रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलीसांसमोर आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तिच्या तामिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासकामी गेली असून तेथील तपासा नंतर सत्यता समोर येणार आहे. तर पतीला ताब्यात घेतल्या वर त्या महिलेला कधी व कशी बांधण्यात आली हे उलगडणार आहे.
Previous Articleग्रामीण भागात वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा
Next Article चव्हाट गल्ली येथे पावसामुळे घर कोसळले









