सावंतवाडी
रस्त्याची साईडपट्टी खचली असल्यामुळे या साईडपट्टीवरून कलंडून चिरे वाहतूक करणारा (Mh 07 C 6114) हा डंपर आंबोली घाटात कुंभेश्वर येथील वळणावर साधारण पंधरा फूट खोल कोसळून सायंकाळीं पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. हा डंपर आंबोली येथे चिरे पुरवठा करून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. डंपर चालकाला अचानक रस्त्याचा अंदाज न आल्याने डंपर एका बाजूला गेला आणि साईड पट्टीवरून चाक कलंडून डंपर थेट खोल घळणीत गेला.या अपघातात सुदैवाने डंपर चालकाला कोणतीही दुखापत झाली नसून डंपरचे मात्र नुकसान झाले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी डंपर चालकाला डंपर मधून सुखरूप बाहेर काढले असून अपघातग्रस्त डंपरही खोल घळणीतून काढण्यात येणार आहे.









