रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक होती बंद
सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी वेंगुर्ला रोडवर रात्री नेमळे तिठा येथे वादळी पावसामुळे भले मोठे बिब्याचे झाड पडल्याने रात्री पासून सकाळी अकरा वाजेपर्यंत वाहतूक बंद होती. यात झाड मुख्य विद्युत तारेवर पडल्याने तीन पोल तुटून नुकसान झाले. मात्र झाड रात्री पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सकाळी स्थानिक ग्रामस्थ आणि अमित बोभाटे टीमने वाहतूक सुरळीत केली.मात्र असे प्रकार वारंवार होऊ नयेत यासाठी सावंतवाडी ,वेंगुर्ला रोडच्या बाजूला असलेली जुनाट झाडे तोडण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.









