हजारोंचे नुकसान ; नुकसान भरपाई द्यावी ; नुकसानग्रस्तांची मागणी
न्हावेली / वार्ताहर
मळगाव कुंभार्ली भागातील रस्तावाडा तसेच तेलकाटा परिसरात गुरुवारी रात्री अचानकपणे विद्युत दाब वाढल्याने अनेक जणांची विजेची उपकरणे जळाली.टीव्ही,फ्रिज,मिक्सर,बल्ब,अशी उपकरणे जळाल्याने ग्राहकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.याबाबत महावितरण विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे. कुंभार्ली भागात गुरुवारी रात्री अचानक विजेचा दाब वाढला.त्यामुळे या भागातील ग्राहकांची विजेची उपकरणे जळाली.याबाबत मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांना स्थानिकांनी सांगितल्यानंतर त्यांनी महावितरणचे शाखा अभियंता अनिकेत लोहार यांना माहिती दिली.त्यानंतर स्थानिक तलाठ्यानी नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. या नुकसानीत सुरेश सहदेव राऊळ २ फॅन व चार्जर मिळून ५२०० रुपये,संदेश सोनुर्लेकर २ फॅन व बल्ब ९५०० , ३ फॅन व फ्रिज मिळून २३ हजार,आत्माराम राऊळ १ फॅन ,फ्रिज व गीझर मिळून ३० हजार रुपये महेश खानोलकर २ इन्व्हर्टर ४४ हजार सुजेश २ मोठे फ्रिज १ लाख ९२ हजार,रुक्मीणी नाईक १ मिक्सर ३ फॅन १८ हजार,उल्हास नार्वेकर १ टिव्ही १ फॅन ४५ हजार प्रसाद नार्वेकर होम थिएटर २५ हजार,संजय तांडेल २ वजन काटे ८५ हजार,संजय धुरी १ टिव्ही व मिक्सर १९ हजार,सुनिल सोनुर्लेकर १ फॅन २२००,संतोष गावडे २ फ्रिज २ फॅन व टिव्ही मिळून ५० हजार,वसंत ठाकूर १ फ्रिज १५ हजार,दत्ताराम राणे १ फॅन १५०० रुपये,आनंद देवळी फ्रिज २ फॅन २ टेबल फॅन व फ्रिज १९ हजार,रामचंद्र देवळी फ्रिज २ फॅन टेबल फॅन १९ हजार,संगणक संच १८ हजार ३०० रुपये,नेहा सावंत १ मॅानिटर व टेबल फॅन १५ हजार,मारुती सावंत टीव्ही व फॅन १२,५०० रुपये,गजानन सावंत टीव्ही व फॅन १२००,५०० रुपये व कृष्णा सावंत स्टडी लाईट व टिव्ही १२,५०० यासह आणखीही काही ग्राहकांची विद्युत उपकरणे जळाली आहेत.