रणझुंजार गृपचे आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
ओटवणे येथील रणझुंजार गृपच्यावतीने रविवारी २१ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ओटवणे शाळा नं १ च्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रणझुंजार गृप आयोजित हे दुसरे रक्तदान शिबीर असुन या शिबिरात ओटवणे परिसरातील रक्तदात्यांसह युवक आणि युवतींनी रक्तदान करावे असे आवाहन रणझुंजार गृपच्यावतीने करण्यात आले आहे.









