tarunbharat impact : शीतपेयांचा कंटेनर लुटणाऱ्या विरोधात बातमी तरुण भारत डिजिटलने प्रकाशित केली होती. त्या बातमीची दखल घेत आज जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी करवीर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहेत. अपघात झाल्यानंतर कंटेनर मधील शीतपेयांच्या बाटल्या पळवून घेऊन जाणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याबाबत तरुण भारत डिजिटल बातमी प्रकाशित केली होती. व्हिडिओ मधील व्यक्ती तपासून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
नेमकं काय घडलं होते?
आज पहाटेच्या सुमारास कोल्हापूर- राधानगरी रोडवरून गोव्याच्या दिशेने शीतपेय घेऊन जाणारा कंटेनर पुईखडीच्या घाटात उलटला.अपघातामुळे कंटेनर मध्ये असणारे कोल्ड्रिंकस हे रस्त्यावर विखुरले होते. याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली. त्यावेळी शीतपेयाच्या बाटल्या पळवण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. घटनेची नोंद कोल्हापूरातील करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, या प्रकरणामुळे बाटल्या पळवण्याविरोधात संतप्त भावना समाज माध्यमात उमटल्या. तसेच तरुण भारतच्या डिजिटल फ्लॅटफॉर्मवर बातमी आल्यानंतर त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान तरुण भारतच्या बातमीची दखल घेत जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी या घटनेची चौकशी करून बाटल्या पळवण्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना करवीर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Previous Articleघरच्या घरी हेल्दी मोमोज
Next Article भारतीय अर्थव्यवस्था संतुलित : खा. जयंत सिन्हा









