जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आवाहन; पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन पर्यटकांनी दक्षता घ्यावी
80 हून अधिक पर्यटकांना वाचवले ची बातमी तरुण भारत ने दिल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाला जाग आली. मुसळधार पावसामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने रांगणागड पर्यटनासाठी बंद केला आहे. तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी देखील आवाहन करून नागरिकांनी दक्षता घ्यावी असे सांगितले आहे. पावसामुळे भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याचे माहिती फलक भटवाडी, वाघ वहाळ व तांब्याच्या वाडी याठिकाणी लावण्यात आल्याची माहिती भुदरगड तहसिलदार अश्विनी अडसूळ यांनी दिली आहे.









