वार्ताहर /गुंजी
पावसाच्या धास्तीमुळे मतदान केंद्रावर ताडपत्री झाकण्याची नामुष्की खानापूर तालुक्मयातील डिगेगाळी येथील सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर आली. त्यामुळे या भागातील शाळांची दयनीय अवस्था आहे. याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. नेहमीच सरकारने सीमाभागातील मराठी शाळा बाबतीत दुजाभाव केल्याचे दिसून येते. सध्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत. मात्र या शाळाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने अनेक शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. अत्यंत धोकादायक परिस्थितीत येथील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये शिक्षण घ्यावे लागते. येथील स्थानिक नागरिक, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य, शिक्षक यांनी शाळा दुऊस्तीसाठी शासनाकडे वेळोवेळी विनंती करूनही अनेक शाळा दुऊस्तीपासून दूरच राहिल्याचे येथील जनतेचे मत आहे. त्यामुळेच आज मतदान प्रक्रियेसाठी अनेक शाळांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांची पाहणी करून तातडीने दुऊस्ती करण्यात येत आहे. पावसापासून मतदानादिवशी मतदान केंद्रात व्यत्यय होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी डिगेगाळी येथील शाळेच्या छतावर ताडपत्री झाकण्यात आल्याचे दिसून येत आहे.वास्तविक सरकारने निवडणुकीपुरता विचार करून शाळेच्या छतावर तात्पुरते ताडपत्री घालून पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी कार्यतप्तरता दाखविली. मात्र अशीच कार्यतप्तरता विद्यार्थ्यांसाठी का दाखवू नये. संपूर्ण पावसाळभर विद्यार्थ्यांचे होणारे हाल ध्यानात ठेवून शाळांची दुऊस्ती करणे गरजेचे आहे, असे मतही नागरिकांतून व्यक्त होत आहे.









