5-3-2023 11-3-2023
मेष
या आठवड्यामध्ये पूर्वी घेतलेल्या निर्णयांच्या बाबतीमध्ये पुन्हा विचार करावा लागेल असे संकेत मिळतील. काही जुन्या गुंतवणुकी नवीन पद्धतीने आणि नवीन ठिकाणी करण्याचा विचार कराल. कुटुंबातील एखाद्या व्यक्ती करता मदत करावी लागेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सर्वसामान्य असेल. आरोग्याची विशेष तक्रार असणार नाही. कामाच्या ठिकाणी धावपळ वाढेल.
मसूर दान द्यावे
वृषभ
आठवड्याची सुऊवात अशा काही घटनांनी होऊ शकते की ज्या तुमच्या मनाला पटणार नाहीत. कामाच्या ठिकाणी आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे किंवा आपण केलेल्या कामाला कोणी विशेष किंमत देत नाही असे वाटून खिन्नता येण्याची शक्मयता आहे. अशावेळी मन स्थिर ठेवावे. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्याकरता हा आठवडा उत्तम असेल. जवळच्या व्यक्तीची मदत मिळेल.
धार्मिक स्थळी बदामाचे दान द्यावे
मिथुन
ज्याना जे वाटायचे ते वाटू द्या पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिलात तर पुढे जाऊन याचा नक्की फायदा होईल. पण याचा अर्थ स्वभावामध्ये हट्टीपणा येऊ देऊ नका. बुद्धी सामर्थ्याच्या बळावर अडचणींवर मात करण्याच्या तुमच्या स्वभावामुळे चार चौघात कौतुक होईल. आजूबाजूला काम करणाऱ्या माणसांपासून मिळालेली मदत कामी येईल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आर्थिकदृष्ट्या थोडी चिंता वाटू शकते.
गटारीच्या पाण्यामध्ये निळू फुले सोडावी
कर्क
आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कौटुंबिक वातावरणामध्ये पाहुण्यांच्या हस्तक्षेपामुळे थोडा कलह निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वाद विवादापासून दूर राहावे. कोणाचीही बाजू घ्यायच्या भानगडीत पडू नका. गुंतवणुकीसाठी हा आठवडा तितकासा चांगला नाही. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये थोड्या नफ्यामध्ये समाधान मानावे लागेल. भावनिक कोंडमारा होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल.
जवळच्या व्यक्तीला सुगंधी फूल भेट द्या
सिंह
भावनेच्या भरात कुठलाही निर्णय घेतला तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आपल्या कृतीमुळे किंवा बोलण्यामुळे कुणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असेल. कुटुंबातील छोट्या मोठ्या वादावादीला दुर्लक्ष करणे योग्य ठरेल. आर्थिक बाजू चांगली असेल. काही नवीन संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे. व्यावसायिकांना अनुकूल आठवडा असेल. वैवाहिक जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल.
बडीशेप खाऊन कामाला जावे.
कन्या
तुम्ही मनातल्या मनात विचार करून ठेवलेल्या योजनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या आठवड्यात अनेक संधी प्राप्त होतील. इतके असूनसुद्धा मनात एक प्रकारची खिन्नता येण्याची शक्यता आहे. काही कारणामुळे कामात लक्ष न लागणे किंवा लोकांशी संपर्क कमी होणे यासारखे अनुभव या आठवड्यात येऊ शकतात. हा काळ स्वत:साठी आणि स्वत:मधल्या चांगल्या वाईट गुणांना परखण्यासाठी वापरावा.
पाच लवंगा जवळ ठेवाव्यात
तूळ
हा आठवडा संमिश्र्र असेल. कामाच्या ठिकाणी काही संधी प्राप्त होतील पण त्यांचा योग्य उपयोग करून घेण्याकरता इतरांची मदत लागू शकते. काही व्यक्ती, ज्यांना तुमची प्रगती होणे बघवत नाही, अशा व्यक्ती गुप्त कारस्थान करून तुमच्या विऊद्ध षड्यंत्र करू शकतात त्यामुळे सावध राहणे अत्यंत गरजेचे असेल. तुमच्या मनातील योजना इतर कोणत्याही व्यक्तीसमोर प्रकट करत असताना दहा वेळा विचार करा.
तांब्याच्या भांड्यात पाणी भरून पिंपळाला घालावे.
वृश्चिक
तब्येतीच्या दृष्टीने हा आठवडा मागच्या काही दिवसांपेक्षा बरा असेल. ज्या आजारांवरती निदान सापडत नव्हते अशा आजारांवरती योग्य उपचाराने मात कराल. आर्थिक बाजू चांगली असेल. कामांचे प्रमाण वाढल्यामुळे काही कामे सोडावीही लागू शकतात. कुटुंबातील वातावरण समाधानकारक असलेतरी कुटुंबातील एखादी व्यक्ती विनाकारण राग राग करेल. वैवाहिक जोडीदाराचे मन समजून घेतले तर वाद टळतील.
धार्मिक स्थळी केळ्यांचे दान द्यावे.
धनु
ज्याचे करावे भले तो म्हणतो आपलेच खरे असा अनुभव येण्याची शक्मयता असल्याने कोणालाही विनाकारण सल्ला द्यायला जाऊ नका. या आठवड्यात आपल्या इमेजला जपणे गरजेचे असेल. काही वैयक्तिक कारणामुळे किंवा अंतर्गत राजकारणामुळे काही व्यक्ती नाव खराब करण्याची शक्मयता आहे. अशावेळी कुटुंबातील व्यक्तींची योग्य साथ मिळेल. त्यातूनही एका ज्येष्ठ व्यक्तीच्या सल्ल्यामुळे फायदा होण्याची शक्मयता आहे.
गरजूला दुधाचे दान द्यावे
मकर
हा आठवडा कष्ट करणाऱ्यांकरता सुवर्णसंधी घेऊन येऊ शकतो. पण कष्टाची तयारी पाहिजे. नवीन नोकरीकरता प्रयत्न करणाऱ्यांना किंवा नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना ध्यानीमनी नसताना एखाद्या परिचित व्यक्तीच्या मदतीमुळे संधी प्राप्त होईल. या आठवड्यात आपल्या वाणीकडे आणि कम्युनिकेशन स्किल्सकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्या मित्राला मदत करण्याकरता धावपळ करावी लागण्याची शक्मयता आहे.
झोपताना उशीखाली सुगंधी फूल ठेवावे
कुंभ
या आठवड्यामध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत कुठल्याही गंभीर विषयावर चर्चा करणे टाळणे जास्त हितकारक ठरेल. बोलताना संयम बाळगणे आवश्यक असेल. चुकीच्या शब्दांचा प्रयोग झाल्यास वातावरण बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी मनाविऊद्ध घटना घडल्यामुळे मन खिन्न होईल. या आठवड्यात आर्थिक निर्णय घेणेसुद्धा जास्त हिताचे नाही. गुंतवणूक करणे किंवा एखाद्याला आर्थिक मदत करणे नुकसानदायक ठरू शकते.
रिकामा मातीचा घडा वाहत्या पाण्यात सोडावा.
मीन
जवळच्या व्यक्तींशी मनातील गोष्टी बोलल्यास मन हलके होतेच पण चुकीच्या व्यक्तींसमोर आपल्या बाबतीत किंवा आपल्या कामाच्या बाबतीत जास्त बोलणे घातक ठरू शकते याचा अनुभव या आठवड्यात येण्याची शक्मयता आहे. या आठवड्यामध्ये टीकेला सामोरे जाल. विरोधकांच्या कारस्थानांचा आणि बोलण्याचा त्रास होऊ शकतो. आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य अनुभव येतील. व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक सध्या टाळावी. जलचरांना खाणे घालावे
आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी, दुकानात पैशांचा प्रवाह सुरळीत राहावा, बरकत यावी म्हणून एका काचेच्या पेल्यामध्ये गंगाजल घेऊन त्यात सव्वा चमचा मीठ घालावे. हा ग्लास घराच्या किंवा दुकानाच्या नैर्त्रुत्य दिशेला ठेवावा. दर आठवड्याला शनिवारी यातील पाणी बदलावे.





