29.1.2023 ते 4.2.2023 पर्यंत
मेष
या आठवडय़ामध्ये काही प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते पण दुसरीकडे काही संधीही प्राप्त होतील ज्यामधून आशादायक वातावरण निर्माण होईल. एकूण काय तर या आठवडय़ात थोडय़ा संयमाची गरज आहे. मित्रपरिवारापासून अपेक्षित अशी मदत मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी उत्साहवर्धक वातावरण मिळणे गरजेचे आहे असे वाटण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जीवन समाधानकारक असेल.
गाईच्या पायाखालील माती जवळ ठेवा
वृषभ
तुम्ही केलेल्या लहानशा चुकीचा बोभाटा हितशत्रू करण्याची शक्मयता आहे. लोकांचे इरादे वेळीच ओळखले तर बऱयापैकी अडचणींपासून मुक्तता होईल. अर्थप्राप्ती करता किंवा कामाच्या निमित्ताने छोटा मोठा प्रवास घडण्याची शक्मयता आहे. ज्या ठिकाणाला भेट द्याल तेथील एखादी व्यक्ती तुमचे काम पूर्ण व्हावे म्हणून मदत करेल. मानसिक तणाव बऱयापैकी कमी होईल. तुम्ही आखलेल्या योजनांना घरच्या सदस्यांकडून पाठबळ मिळणे अवघड दिसते.
सफेद रुमाल जवळ ठेवावा
मिथुन
या आठवडय़ात कोणाचीही थट्टा मस्करी करताना दहादा विचार करावा. कुचेष्टेमुळे जवळच्या व्यक्ती दुरावण्याची शक्मयता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामांवरती अधिकारी वर्ग खुश असेल पण त्याचा आर्थिक लाभ होईलच असे सांगता येत नाही. तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखादा आजार पुनः पुन्हा त्रास देऊ शकतो. विद्यार्थी वर्गाने इतर गोष्टींपेक्षा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
गरजू व्यक्तीला चादर भेट द्यावी
कर्क
तब्येतीची तक्रार सोडली तर बाकी बऱयाच चांगल्या गोष्टी या आठवडय़ात घडतील. जुन्या मित्रांची भेट संभवते. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल पण तुमच्या नियोजनामुळे कामे पूर्ण होतील. आठवडय़ाच्या सुरुवातीला झोपेची तक्रार वाटू शकते. बुधवार गुरुवारी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लहान सहान कारणावरून संततीशी वाद संभवतो. वैवाहिक जीवनात एकमेकांना सहकार्य करावे लागेल.
लहान मुलांना बत्तासे भेट द्यावे
सिंह
कोणाशीही वादविवाद न करता किंवा न भांडता सामोपचाराने प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न केला तर नातीही टिकतील आणि समस्यासुद्धा समाप्त होतील. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी वाद संभवतो. सरकारशी संबंधित किंवा फायनान्सशी संबंधित एखादी असे काम पूर्ण होईल याची तुम्ही प्रतीक्षा करत होता. घरातील सदस्यांनी एकमेकांशी सुसंवाद साधावा आणि एकमेकाला सहाय्य करावे यासाठी प्रयत्न करा.
वडाच्या झाडाला दूधमिश्रित पाणी घाला
कन्या
धरसोड वृत्तीला आवर घालावा लागेल. कामे अर्धवट टाकली तर पुढे जाऊन मोठे नुकसान होऊ शकते. हे करू किंवा ते करू या मनःस्थितीत न राहता जे योग्य आहे ते काम करावे. या आठवडय़ात बऱयाच गोष्टींचा कंटाळा येऊ शकतो, मन मारून कामे करावी लागू शकतात पण धैर्य धरून आपल्या वाटेवर चालावे. कौटुंबिक वातावरणात सुधारणा होईल. कुटुंबातील सदस्याचा हट्ट पूर्ण करण्याकरता खर्च करावा लागेल.
धार्मिक स्थळी केळी दान द्यावी
तुळ
महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करणार असाल तर कागदपत्रांना सांभाळावे लागेल. एखाद्या व्यक्तीच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. परिचित व्यक्ती तिचे काम करण्याबद्दल तुम्हाला गळ घालेल, मदत करत असताना स्वतःचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी टीमवर्क महत्त्वाचे असेल. सगळय़ांना सोबत घेऊनच काम करावे लागेल. दीर्घकालीन आजार असणाऱयांनी तब्येतीची काळजी घ्यावी.
कपिला गायीची सेवा करावी
वृश्चिक
आरोग्याच्या दृष्टीने येणारा आठवडा खास अशी चांगली फळे देऊ शकणार नाही. पोटासंबंधी विकार होऊ नये यासाठी बाहेरचे खाणे पिणे किंवा कुपथ्य करणे नुकसान दायक ठरू शकते. व्यावसायिकांना एखादे काम होता होता बिघडत आहे असा अनुभव येऊ शकतो. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱयांनी समोरच्या व्यक्तीचे मत घेतल्याशिवाय कामे करू नयेत. आर्थिकदृष्टीने सर्वसामान्य आठवडा असेल.
मोती आणि पोवळे जवळ ठेवावे
धनु
जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या हट्टीपणामुळे किंवा हेकेखोर स्वभावामुळे मानसिक त्रासाची शक्मयता आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीलाच काही कामे पूर्ण झाल्याने हुरूप वाढेल. आठवडय़ाच्या मध्याला एखाद्या समारंभात भाग घ्याल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. प्रिय व्यक्तीची भेट झाल्याने मन आनंदी असेल. कुटुंबातील ज्ये÷ पुरुष व्यक्तीची काळजी वाटण्याची शक्मयता आहे. पैशांच्या बाबतीत सावध रहावे.
आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालावी
मकर
आरोग्याची तक्रार कमी झाली असली तरी काळजी घेणे आवश्यक असेल. पूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेबद्दल अति विचार केल्याने मूड खराब होऊ शकतो. मित्र परिवारासोबत एखाद्या फंक्शन मध्ये भाग घ्याल. सावध राहिला नाहीत तर एखादी व्यक्ती मोठा आर्थिक लाभ होईल असे भासवून हातोहात फसवू शकते. कुटुंबातील वातावरण समाधानकारक असेल. ज्ये÷ व्यक्तींचा सल्ला कामी येईल. वैवाहिक संबंधात ताण तणाव असेल.
गरजू व्यक्तीला गुळाचे दान द्यावे
कुंभ
नको तिथे पैसे गुंतवल्याने आर्थिक नुकसानाची शक्मयता आहे, सावध रहा. तुमचा सल्ला आणि मदत तुमच्या मित्राच्या कामी येईल. कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील ज्यातून फायद्याची शक्मयता आहे. या आठवडय़ात कोणत्याही परिस्थितीमध्ये खोटे बोलणे टाळावे. नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. आर्थिक बाजू चांगली असली तरी खर्च जास्त करू नये.
लाल हातरुमाल जवळ ठेवावा
मीन
धावपळीचा आठवडा असेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल आणि त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी कामाचा व्यापही वाढेल. यामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो आणि याबरोबरच मानसिक थकवा ही येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी काही प्रसंग असे घडतील जिथे तुम्हाला कुणा एकाची बाजू घ्यावी लागेल अशावेळी भविष्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि तिचे विचार वेगळे असतात हे विसरू नये.
लाल काचेची गोटी जवळ ठेवावी
धनप्राप्ती चांगली व्हावी आणि कमावलेले धन टिकावे याकरता शुभमुहूर्तावर किंवा चतुर्थीच्या दिवशी मोठा पिवळा रुमाल घ्यावा. त्यावर पाच नवीन हळकुंडे, थोडय़ा अक्षता(हळद लावून पिवळय़ा केलेल्या), लहान आकाराचा नारळ, पाच सुपाऱया आणि पाच नाणी (हळदीने पिवळी केलेली) या सगळय़ा वस्तू ठेवाव्या त्याचे गाठोडे बांधावे. रोज याला उदबत्ती ओवाळावी.





