ऑनलाईन टीम/तरुण भारत :
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांचा बळी ठरला आहे. कुलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी एका शाळेतील शिक्षकाला गोळ्या घातल्या. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.अलीकडेच दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताचीही गोळ्या घालून हत्या केली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुलगामच्या गोपालपुरा भागात जखमी झालेल्या शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो सांबा येथील रहिवासी होती. काश्मीर झोन पोलिसांनी या हल्ल्याला दुजोरा दिला असून, या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना त्वरीत पकडले जाईल असे सांगितले.
काश्मिरी टीव्ही अभिनेत्री अमरीन भट्टचीही बुधवारी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. बडगामच्या चाडूरा येथे झालेल्या या घटनेत १० वर्षांचा पुतण्या जखमी झाला आहे. भट्ट यांचे नातेवाईक झुबेर अहमद यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, “तिच्या घराबाहेर दोन पुरुष आले आणि तिच्यावर गोळ्या झाडल्या.”









