वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेतील स्पोकेनी येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या कनिष्ठांच्या विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू तारा शाह आणि आयुश शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
मुलींच्या एकेरीतील सामन्यात तारा शाहने झेक प्रजासत्ताकच्या लुसी व्रुलोव्हाचा केवळ 25 मिनिटात 21-8, 21-7 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. तर आयुष शेट्टीने फिलिपिन्सच्या जमाल रेहमत पंडीचा 21-16, 21-12 असा पराभव करत मुलांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दरम्यान मिश्र दुहेरीत भारताच्या सात्विक रे•ाr आणि वैष्णवी खेडकर यांचे आव्हान संपुष्टात आले आहे









