पाणीपुरवठा कार्यालयाच्या गलथान कारभारावर संताप
वार्ताहर /लाटंबार्से
पाणी खात्याकडून कोणतीही पूर्व कल्पना न देता डिचोली तालुक्यातील साळ या गावात बुधवार दि. 14 जून रोजी पाणी न सोडल्यामुळे नळ कोरडे पडले. बराचवेळ नळांना पाणी येत नसल्याची वाट पाहून महिलांनी विहिरीवर जाऊन पाणी आणले व पाणीपुरवठा कार्यालयाच्या गलथान कारभारा बाबत संताप व्यक्त केला. सकाळीच नळाला पाणी येणार या भरवशावर राहिलेल्या महिलांना नळ कोरडे पडल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. विहिरीवरून पाणी आणावे लागले असल्यामुळे इतर कामांचा बट्याबोळ झाला. सकळीच शाळेत जाणाऱ्या मुलांची तयारी करून पाणी आणावे लागल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. एक काम अडल्यामुळे महिलांना पुढील सर्वकामे धावपळीने करावी लागली. यापूर्वी उद्या नळांना पाणी येणार नसल्याने अगोदर सांगितले जात होते. परंतु यावेळी अचानक पाणी न सोडल्यामुळे महिलांनी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडली.









