तरुणभारत ऑनलाइन टीम
अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच हटके भूमिका साकारत असते.प्रत्येक चित्रपटात तिची दमदार भूमिका असते. आत्ताही तापसी ‘डंकी’ या चित्रपटातून एक वेगळी भूमिका साकारणार आहे.पण या चित्रपटाद्वारे तिची १० वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होणार आहे. तापसी शाहरुख खान सोबत प्रथमच स्क्रीन शेअर करणार आहे.
शाहरुख खानने १९ एप्रिलला सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने आपल्या आगामी चित्रपटाचे नाव जाहीर केलं आहे.डंकीची घोषणा झाल्यानंतर,तापसीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून SRK शैलीत सांगितले की ती आता डंकीमध्ये बॉलीवूडधील किंग सोबत रोमान्स करताना दिसणार आहे.तिला ही संधी मिळण्यासाठी १० वर्षे लागली असं तापसी म्हणाली आहे. तसेच जर तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट हवी असेल तर संपूर्ण विश्व तुमच्यासाठी ती मिळवण्यासाठी कामाला लागते अशी तिने आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे. एकूणच तापसी किंग खानसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.डंकी या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी असून शाहरुख पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम करणार आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी डंकी प्रदर्शित होणार आहे.









