ओटीटीच्या जगततात अनेक उत्तम क्राइम थ्रिलर सीरिज उपलब्ध असून याचा मोठा प्रेक्षकवर्ग देखील आहे. आता प्राइम व्हिडिओने नवी वेबसीरिज ‘पीआय-मीना’ची घोषणा केली आहे. ही एक इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राइम थ्रिलर सीरिज असून यात तान्या मानिकतला मुख्य भूमिकेत आहे.

या सीरिजची निमिंती अरिंदम मित्रा यांनी केली असून दिग्दर्शन देवालॉय भट्टाचार्य यांनी केले आहे. तान्यासोबत परमव्रत चट्टोपाध्याय, जिशू सेनगुप्ता, विनय पाठक आणि जरीना वहाब मुख्य भूमिकेत दिसून येतील. 8 एपिसोड्सची सीरिज हिंदीसोबत तमिळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड भाषेत 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक देवोलॉय यांचा हा पहिलाच हिंदी प्रोजेक्ट आहे. तान्या ही ओटीटीवरील प्रसिद्ध चेहरा आहे. यापूर्वी ती नेटफ्लिक्सची सीरिज टूथ परी-वेन लव्ह बाइट्समध्ये दिसून आली होती. या सीरिजमध्ये तिच्यासोबत शांतनू माहेश्वरी मुख्य भूमिकेत होता. तान्याला फ्लेम्स या सीरिजमुळे मोठी ओळख मिळाली होती. यानंतर ती सुटेबल बॉय, फील्स लाइक इश्कमध्ये दिसून आली होती. परमव्रत आणि जिशू सेनगुप्ता देखील ओटीटीवर अत्यंत सक्रीय आहेत. जिशू यापूर्वी अंतिम-द फायनल या चित्रपटात दिसून आली होती. पीआय मीना ही त्याची पाचवी हिंदी सीरिज आहे. त्याने स्कायफायरद्वारे हिंदी ओटीटी जगतात पदार्पण केले होते. यानंतर टाइपरायटर, क्रिमिनल जस्टिस, द ट्रायलमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती.
परमव्रत चट्टोपाध्याय यापूर्वी मुंबई डायरीज या सीरिजमध्ये दिसून आला होता. याचबरोबर जहानाबाद-ऑफ लव्ह अँड वॉरमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती.









