रत्नदुर्ग येथील विवाहिता मृतदेह प्रकरण
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी मृत आढळलेल्या तन्वी घाणेकर आत्महत्या प्रकरणाचा कसून तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आह़े यासाठी तन्वी हिचे मागील 6 महिन्यांचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून तपासण्यात येणार आहेत़ यासाठी संबंधित मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीला कॉल डिटेल्स उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार पोलिसांकडून करण्यात येणार आह़े यातून तन्वी हिच्याबाबत अधिक महिती प्राप्त होऊ शकेल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आह़े.
शहरातील खालचा फगरवठार येथील रहिवासी असलेल्या तन्वी रितेश घाणेकर (33) ही 29 सप्टेंबर 2020 पासून बेपत्ता झाली होत़ी यासंदर्भात तिचा पती रितेश याच्याकडून रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली होत़ी पोलिसांकडून घेण्यात आलेल्या शोधमोहिमेत तन्वी हिची दुचाकी (एमएच 08 एक्स 7116) भगवती बंदर येथे आढळून आल़ी तर मोबाईल लोकेशन दुसरीकडेच दाखवत असल्याने अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होत़े
दरम्यान 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तन्वी हिचा मृतदेह रत्नदुर्ग किल्ल्यावरील कपल पॉईंट येथील 200 फूट दरीत आढळून आल़ा पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये तन्वी हिने आत्महत्या केली असल्याचे समोर आल़े तसेच शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात घातपात झाला नसल्याचे नमूद करण्यात आल़े त्यानुसार आता पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आह़े तसेच तन्वी हिने नेमके कोणत्या कारणावरून आत्महत्या केली विविध शक्यतांची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
हे ही वाचा : दापोली कर्दे समुद्रात १८ वर्षीय पर्यटक बेपत्ता
तन्वी ही मिरजोळे एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीत काम करत होत़ी याठिकाणी काम करत असलेल्या तन्वी हिच्या सहकाऱयांशी पोलिसांकडून चौकशी करण्यात आल़ी यामध्ये काही महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती आली आह़े तसेच मागील 6 महिन्यात तन्वी हिच्या संपर्कात कोण कोण होत़े याची देखील पडताळणी पोलिसांकडून होणार आह़े त्यासाठी कॉल डिटेल्सबाबत माहिती पोलिसांकडून मागवण्यात आली आह़े
तन्वी हिचा मृतदेह पोलिसांना आढळून आला असला तरी तिचा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाह़ी रत्नदुर्ग किल्ल्याच्या परिसरात हा मोबाईल पडला असल्यास त्याचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरत आह़े या मोबाईलमधून काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े मात्र या परिसरात आलेले जंगल व अतिशय खोल दरीमुळे याठिकाणी शोधमाहिम घेणे अवघड ठरत आह़े.
व्हिसेरा तपासणीसाठी रवाना
तन्वी घाणेकर हिने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असले तरी सर्व शक्यता पोलिसांकडून पडताळण्यात येत आह़े याच अनुषंगाने शवविच्छेदनाच्यावेळी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होत़ा हा व्हिसेरा आता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आह़े अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आह़े