Tantamukt Samiti former president Mahadev Gurav passed away
चराठा विकास सोसायटीचे माजी चेअरमन तथा चराठा तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष महादेव ऊर्फ बाबी यशवंत गुरव (६६) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. चराठा देवस्थानचे पुजारी तथा मानकरी असलेल्या महादेव गुरव यांनी चराठा ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना गावच्या विकासासह सहकार, धार्मिक व सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत गुरव कुटुंबीयांचे सांत्वन केले. शनिवारी सकाळी ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, भाऊ, नातवंडे, जावई असा परिवार आहे. चराठा देवस्थानचे ज्येष्ठ मानकरी यशवंत उर्फ मामा गुरव यांचे ते सुपुत्र तर सहदेव गुरव यांचे ते भाऊ होत. तसेच ओटवणे सरपंचा सौ उत्कर्षा उमेश गावकर आणि चराठा येथील बांदेकर बेकरी प्रॉडक्ट्सच्या राधिका बांदेकर यांचे ते वडील होत.
ओटवणे / प्रतिनिधी









