नारायण मुचंडीकर यांचे प्रयत्न
बेळगाव : उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याने पिरनवाडी येथे पाणी पुरवठ्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. युवा समिती सीमाभागाचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांना पाणी उपलब्ध होत आहे. यावेळी युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेना उपतालुका प्रमुख पिराजी शिंदे, युवा समिती सरचिटणीस मनोहर हुंदरे, नारायण मुचंडीकर, उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते टँकरचे पूजन करण्यात आले. पाण्याची गरज भासल्यास संपर्क साधण्याचे आवाहन नारायण मुचंडीकर यांनी केले. यावेळी इंद्रजीत धामणेकर, ओमकार आपटेकर, रामनाथ मुचंडीकर यासह इतर उपस्थित होते.









