तृप्ती पुरोहित, अभिनव मूर्ती आपल्या गटात विजेते
बेळगाव : मंगळूर येथे सुरू असलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय मनांकित टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या तनिष्का काळभैरवणे 2 सुवर्ण 1 एक रौप्य पदक पटकावीत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याचप्रमाणे बेंगलोरच्या अभिनव मूर्तींने 19 वर्षाखालील गटात तर महिलांच्या गटात तृप्ती पुरोहित यांनी विजेतेपद पटकावले आहेत. मंगळूर येथील मुलीर इंदोर स्टेडियमवर सुरू असलेल्या राज्य मनांकित टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या तनिष्क काळभैरवणे स्पर्धेत सहभाग घेऊन 19 वर्षाखालील गटात विजेतेपद तर 17 वर्षाखालील उपविजेतेपद पटकावीत दोन सुवर्ण एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली आहे. पंधरा वर्षाखालील गटात अंतिम फेरीत तनिष्का काळभैरवणे साक्षी संतोषचा 11-6,11-2,11-3 अशा 3-0 सेटमध्ये पराभव करून विजय पटकावले तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात मनांकित हिया सिंगने तनिष्का काळभैरवचा 10-12, 11-8, 11-7, 11-4 सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले या गटात तनिष्काला रौप्य पदकावार समाधान मानावे लागले.
17 वर्षाखालील गटात उपांत्य फेरीच्या सामन्यात तनिष्काने नीती अग्रवालचा 4-11, 11-4, 12-10, 11-9 अशा सेटमध्ये पराभव अशा सेटमध्ये तर हिमांशीने हिया सिंगचा 11-6, 11-13, 11-7, 7-11, 11-6 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीत तनिष्का काळभैरवणे हिमांशी चौधरीचा 4-11, 13-11, 11-8, 19-17, 10-12,11-6 अशा कडव्या लढतीनंतर विजेतेपद पटकावले तर महिलांच्या उपांत्य मनांकित तृप्ती पुरोहित कडून तनिष्का 4-2 अशा सेटमध्ये पराभव पत्करावा लागला यामुळे या गटात तनिष्काला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. मुलांच्या गटात अभिनव मूर्तीने अथर्व नवरंगचा 4-11, 11-9, 12-10, 8-11,12-10,11-4 मध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. तनिष्का काळभैरवला डीपी स्कूलच्या प्रा.रोजम्मा, सिस्टर अलमा, क्रीडा शिक्षिका सिल्वया डिलीमा, अमोलीन, वडील कपिल काळभैरव, आई सोनाली काळभैरव यांच्यातर्फे गौरव करण्यात आला आहे तर तनिष्काला फिटनेस टेनर संध्या पाटील यांचे मार्गदर्शन लागत आहेत









