रियांश जलाल, अधोत यु., राशी राव यांना विजेतेपद
बेळगाव : बेळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित विनया कोटियन स्मृती राज्य मानांकीत टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या तनिष्का काळभैरवने दोन गटात विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट साधला. मुलांच्या गटात रियांश जलाल व अधोत यु. तर मुलींमध्ये राशी राव यांनी विजेतेपद पटकाविले.टिळकवाडी क्लबच्या टेबल टेनिस सभागृहात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेत, 17 वर्षांखालील मुलींची एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत तनिष्का कालभैरवने लक्ष्मी आश्रिताचा 11-3, 11-1, 11-3, राशी रावने सुमेधा भटचा 11-7, 11-6, 11-7, कैरा बालिगाने इरेन सुभाषचा 11-8, 13-15, 11-7, 11-5, शिवानी महेंद्रनने दीक्षिता नाईकचा 11-9, 11-4, 11-5 असा पराभव केला.
उपांत्य फेरीत तनिष्का कालभैरवने राशी रावचा 11-6, 11 -3, 11-7, शिवानी महेंद्रनने कैरा बालिगाला 5-11, 11- 7, 11-6, 12-10 पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तनिष्का कालभैरवने शिवानी महेंद्रनचा 11-5, 11-4, 15-13 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. 15 वर्षांखालील मुलींच्या एकेरीतील उपांत्यपूर्व सामन्यात मिहिका उडुपाने राशि रावचा 11-5, 8 -11, 11-9, 7-11, 11-6, कृष्णा करकेराने इरेन सुभाषचा 8-11, 2-11, 11-8, 11-7, 11-9, साक्ष्य संतोषने लक्ष्मी आश्रिताचा 11-9, 11-7, 11-3, तनिष्का कालभैरवने आराध्याचा 11-5, 11-7, 11-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य लढतीत कृष्णा करकेराने मिहिका उडुपाला 11-9, 7-11, 11-5, 11-7, तनिष्का काळभैरवने साक्ष्या संतोषचा 11-5, 11-9, 11-6 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनिष्का कालभैरवने कृष्णा करकेराचा 11-5, 11-7, 11-6 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. मुलांच्या गटात रेयांश जालानने रियांश गर्गचा 11-7, 12-10, 11-8, पृथ्वी मेननने प्रथम रावचा 6-11, 13-11, 11-7, 11 -7, अमन थॉमसने आदियोतचा 11-3, 11-2, 6-11, 11-8, श्रीराम किरणने अंकुश बालिगाचा 11-2, 10-12, 12-10, 11-5 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत रेयांश जालानने पृथ्वी मेननचा 11-9, 11-8, 11-7, अमन थॉमसने श्रीराम किरणचा 11-6, 5-11, 11-5, 5-11, 11-8 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अतिम फेरीत रेयांश जालानने अमन थॉमसचा 11-9, 11-8, 11-6 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्य सामन्यात तनिष्क काळभैरवने केरा बालिगाचा 11-5, 11-9,8-11, 11-8 तर दुसऱ्या उपांत्य लढतीत राशी रावने सुमेधा भटचा 11-8, 11-7, 15-13 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत राशी रावने तनिष्का काळभैरवचा 6-11, 15-13, 11-9, 11-3, 11-8 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तर एनएमएसच्या अंतिम सामन्यात अधोतने अमन थॉमसचा 11-3, 11-9, 11-6 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले.









