जिल्हास्तरीय शटल बॅडमिंटन स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित बीडीबीए चषक जिल्हास्तरीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत आर्यन भट, साचित, जान्हवी, श्रावणी, अल्ड्रिना, अर्ना, तनिष्का कोरीशेट्टी आदींनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महाबळेश्वरनगर येथील बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या बॅडमिंटन कोर्टवर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलींच्या एकेरीत आराध्या वि.वि. अन्विता 30-7, अनिका वि.वि. सानवी 30-12, मनवा वि.वि. आराध्या 30-15, आराध्य वि.वि. प्रणिका 30-15, आराध्य वि.वि. शानवी 30-17. मुलांच्या गटात : समन्यु वि.वि. साईश 30-12, रिद्धिश वि.वि. विवान 30 -12, सोनित वि.वि. केविन 30-13, शौनक वि.वि. गुरुवीर 30-10, अभिजीत वि.वि. अर्थव 30-8, अल्बेन वि.वि. रोहित 30 -15, रुषभ वि.वि. अनिकते 30-15, यशिस वि. अगस्त्या 30 -12. मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत : अर्ना वि.वि. साची 30-12, जान्हवी वि.वि. श्रावणी 30 -15, अल्ड्रिना वि.वि. अरिना 30-5, अशिता वि.वि. अनिका 30-6. 13 वर्षाखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत : हर्दिन वि.वि. अवनीश 30-17, नमन वि.वि. समन्यु 30-15, नक्षत्र वि.वि. साईश 30-10, प्रितम वि.वि. विहान 30-22. 15 वर्षाखालील मुलींच्या उपांत्य फेरीत : तनिष्का कोरीशेट्टी वि.वि. अस्ता 30-8, अर्ना वि.वि. अल्ड्रिना 30-15, आदीती वि.वि. शिवानी 30-25, मिशेल वि.वि. मंदिरा 30-5. मुलांच्या गटातील उपांत्यपूर्व फेरीत : माहिम वि.वि. नक्षत्र 30-18, नमन वि.वि. तोशन 30-15, तनुष वि.वि. वृषंक 30-20, रणवीर वि.वि. साईश 30-15. 17 वर्षाखालील मुलांच्या उपांत्यपूर्व फेरीत : आदीत्या वि.वि. आदीत्य 30-6, वृषंक वि.वि. आदेश 30-17, रणवीर वि.वि. प्रितम 30-28, माहिन वि.वि. धीरज 30 -5 अशा गुण फरकाने पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.सोमवारी अंतिम फेरीतील सामने खेळविले जाणार असून सायंकाळी बक्षीस वितरण होणार आहे.









