वृत्तसंस्था/ तेहरान
भारताच्या तानिया हेमंतने अग्रमानांकित व आपल्याच देशाच्या तसनिम मिरला पराभवाचा धक्का देत 31 व्या इराण फज्र इंटरनॅशनल चॅलेंज महिलांच्या स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकावले. तानियाने अंतिम सामन्यात तसनिमवर 21-7, 21-11 अशी सहज मात केली.
दिवसातील हा सर्वात अल्प कालावधीचा सामना ठरला. बीडब्ल्यूएफ स्पर्धेत तानियाने तसनिमवर मिळविलेला हा पहिलाच विजय आहे. याआधीच्या दोन लढतीत तसनिमने तानियावर विजय मिळविला होता.









