बीए.एल.एल.बी परिक्षेत सावित्रीबाई फुले विद्यापीठातून आली प्रथम
कु. तनया रामचंद्र वाडकर बी.ए.एलएलबी परिक्षेत सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मॉडर्न लाॅ काॅलेज पुणे येथून डिस्टिंक्शनसह प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच पाचही वर्ष पहिली येण्याचा बहुमान पटकावला त्याबद्दल राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी या मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन तिचा सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी मंडळाचे सचिव दीपक सावंत, उपाध्यक्ष दिलीप पवार, अरुण घाडी ,बंड्या तोरस्कर, महादेव राऊळ, सुरेश भोगटे ,प्रदीप नाईक ,यशवंत देसाई, उमेश खटावकर ,प्रदीप भालेकर, विलास जाधव, उदय भराडी, मनोज राऊळ सोन्या कासार ,संजय साळगावकर , व रवी जाधव उपस्थित होते.









