Solapur News: उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे दिनांक 27 व 28 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आज केले. परांडा येथील कोटला मैदानावर शिबीर होणार असून याची पाहणी करण्याकरिता तानाजी सावंत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले,महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली प्रतिबंधात्मक उपचार व निदानात्मक उपचार या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या शिबिरात ह्रदय रोग,अस्थिव्यंग,डोळ्याचे विकार,कर्करोग,पोटाचे विकार,मेंदूचे विकार,यासह इतर गंभीर आजाराची तपासणी,औषधोपचार,विविध चाचण्या आणी अवघड शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत .उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील आबालवृद्ध तसेच माता-भगिनी यासर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही या निमित्ताने त्यांनी केले आहे.
Previous Articleकसाई खड्डा परिसरात युवकावर चाकू हल्ला
Next Article ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे सारा खान अत्यवस्त









