व्हाईस चेअरमनपदी आर. आय. पाटील : दोघांचीही बिनविरोध निवड : संचालक मंडळाकडून अभिनंदन
वार्ताहर/काकती
येथील मार्कंडेय साखर कारखान्याच्या चेअरमनपदी तानाजी मिनू पाटील तर व्हा. चेअरमनपदी रामचंद्र पाटील उर्फ आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सहकार संस्थाचे उपनिबंधक मणी एम. एन. यांच्याकडे चेअरमन व व्हा. चेअरमनपदासाठी एकमेव दोनच अर्ज दाखल करण्यात आले होते. शेतकरी बचाव पॅनेलचे तानाजी पाटील चेअरमनपदासाठी तर व्हा. चेअरमनपदासाठी आर. आय. पाटील यांची नावे निश्चित झाली होती. परंतु औपचारिक घोषणा करणे बाकी होते. दरम्यान निवडणूक अधिकारी यांनी थोडी उशीराच निर्णय प्रक्रियेच्या कामकाजाला सुऊवात केली. चेअरमनपदासाठी तानाजी पाटील, व्हा. चेअरमनपदी आर. आय. पाटील यांची घोषणा निवडणूक अधिकारी मणी एम. एन. यांनी केली. टाळ्याच्या गजरात संचालक मंडळाने जल्लोषात आनंद व्यक्त केला. मावळते चेअरमन अविनाश पोतदार यांनी नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आतापासूनच गळीत हंगामाचे नियोजन करून जबाबदारी पार पाडावी असे त्यांनी आवाहन केले.
पारदर्शकतेने जबाबदारी पार पाडू
नूतन चेअरमन तानाजी पाटील व व्हा. चेअरमन आर. आय. पाटील म्हणाले, प्रर्वतक रामभाऊ पोतदार, गुरुनाथ पुट्रे, शटुप्पण्णा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. सर्वांच्या सहकार्यातून पाच वर्षे घेतलेली जबाबदारी पारदर्शकतेने पार पाडू अशी ग्वाही दिली. संचालक सुनील अष्टेकर यांचेही समयोचित भाषण झाले. नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे यावेळी शिवाजी सुंठकर, युवराज हुलजी, सरस्वती पाटील, पुंडलिक पावशे, जयराम पाटील, सुभाष हुद्दार, काकती कृषी पत्तीनचे व्हा. चेअरमन यल्लाप्पा आनंदाचे, सुरेश राठोड, विजय पावशे यासह अनेक संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले या समयी संचालक शिवाजी कुट्रे, बसवंत मायाण्णाचे, बाबुराव पिंगट, सिद्दाप्पा टुमरी, बसवराज घाणगेर, जोतिबा अंबोळकर, लक्ष्मण नाईक, बाबासाहेब भेकणे, सुनील अष्टेकर, चेतककुमार कांबळे, वसुंधा म्हाळोजी, वनिता अगसगेकर आदी उपस्थित होते.









