वृत्तसंस्था / लंडन
इंग्लंड महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज टॅमी बेमाँट आता आगामी होणाऱ्या वनडे चषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याकरिता दर्जेदार कामगिरी करण्यावर अधिक लक्ष देत आहे. इंग्लंड महिला क्रिकेट संघाला आता चार्लोटी एडवर्डस् ही नवी प्रशिक्षिका लाभली आहे.
बेमॉंटने 2009 साली क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले. पण कामगिरीतील सातत्याचा अभाव झाल्याने बेमाँटला अलिकडेच झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड समितीने तिला डावलले होते. इंग्लंड महिला संघाची फलंदाजी अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न चालु आहे. मात्र 34 वर्षीय बेमाँटला आता माईया बाऊचर, अॅलिसी कॅप्से, सोफीया डंकले आणि माजी कर्णधार नाईट यांच्याकडून कडवा प्रतिकार होऊ शकेल. भारतामध्ये होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडच्या हालचालेंना आतापासूनच प्रारंभ झाला आहे.









