वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बुद्धिबळातील नवा व सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या डी गुकेशला त्याच्या अपूर्व कामगिरीचा सन्मान म्हणून 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
चेन्नईस्थित 18 वर्षीय गुकेशने गुरुवारी चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. ‘त्याच्या या अतुलनीय कामगिरीचा गौरव करताना त्याला 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करताना अत्यानंद होत आहे,’ असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. ‘त्याच्या या ऐतिहासिक विजयाने भारताचा गौरव वाढविला असून त्याची ही कामगिरी देशाला अभिमानास्पद अशीच आहे. भविष्यातही त्याच्याकडून अशीच गौरवास्पद कामगिरी होत राहो,’ असेही त्यांनी म्हटले आहे.









