वृत्तसंस्था / राऊरकेला
पुरुषांच्या हॉकी इंडिया लिग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात तामिळनाडू ड्रॅगन्सने दिल्ली पायपर्सचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला. या सामन्यात तामिळनाडू ड्रॅगन्सच्या जीप जेनसनने 6 व्या मिनिटाला, नाथन् इप्रामुसने 19 व्या मिनिटाला आणि ब्लेकी गोव्हर्सने 21 व्या मिनिटाला गोल केले. दिल्ली पायपर्सतर्फे टॉमस डॉमेनीने 2 आणि 37 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले.









