कोल्हापूरः
भामटे (ता.करवीर) येथे गेले दोन दिवस आदर्श हायस्कूलच्या ग्राऊंडवर कोल्हापूर जिल्हा व शहर असोसिएशन, कोल्हापूर यांच्या मान्यतेने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी जिल्हा व शहर कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटासाठी शहर व जिल्हा विभागातून सुशांत तांबोळकर, शुभम सिदनाळे, तेजस मोरे आणि अतुल डवरी या चार मल्लांची निवड झाली आहे.
कोल्हापूर शहर कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संग्राम पाटील व कोल्हापूर ग्रामीण कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार व रविवार भामटे येथील आदर्श हायस्कूलच्या पटांगणावर ही निवड चाचणी पार पडली.या निवड चाचणीमधून कोल्हापूर शहर व ग्रामीण विभागातून मॅटवरील दोन आणि मातीवरील दोन अशा प्रत्येकी चार पैलवानांची प्रत्येक गटामधून निवड झाली आहे .या निवड झालेल्या पैलवानांची नावे पुढीलप्रमाणे-
अ टीम वरिष्ठ राज्य कुस्ती शहर विभाग मॅट व माती विभाग-
५७ किलो रोहित पाटील ,अजित साळवी
६१ किलो- रमेश इंगवले, सुरज अस्वले ,
६५ किलो आर्यन पाटील ,करणसिंह देसाई
७० किलो साताप्पा हिरुगडे, आकाश कापडे
७४ किलो आदर्श पाटील, अनुप पाटील
७९ किलो नितीन चव्हाण, प्रवीण पाटील
८६ किलो सुदेश नरके, राम कांबळे
९२.किलो श्रेयश घाट, प्रतीक म्हेत्तर
९७ किलो ऋतुराज शेटके, सुदर्शन पाटील
महाराष्ट्र केसरी गट शुभम सिदनाळे, सुशांत तांबोळकर
अ टीम वरिष्ठ राज्य कुस्ती चाचणी जिल्हा ग्रामीण मॅट विभाग व माती विभाग-
५७ किलो वैभव पाटील, नरसिंह पाटील
६१ किलो अजय काकडे, प्रवीण वडगावकर
६५ किलो शुभम पाटील, सद्दाम शेख
७० किलो सौरभ पाटील ,कुलदीप पाटील
७४ किलो हर्षद दानोळे, निलेश हिरुगडे
७९.किलो विनायक वासकर ,प्रताप माने
८६ किलो दर्शन चव्हाण ,अक्षय साळवी
९२ किलो ऋषिकेश पाटील ,स्वप्निल शेंडे
९७ किलो मोहन पाटील, शशिकांत बोंगार्डे
महाराष्ट्र केसरी गट तेजस मोरे, अतुल डवरी
स्पर्धेचा समारोप कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते तर उद्घाटन देवराज नरके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कुंभी उपाध्यक्ष राहुल खाडे, डॉ. के. एन. पाटील, सतीश देसाई, कुंभी संचालक विलास पाटील (कोपार्डे), निवास वातकर,कुंभी बँक संचालक प्रा.एस.पी.चौगले (वाकरे), राष्ट्रवादी काँग्रेसचे करवीर अध्यक्ष शिवाजी देसाई,मुख्याध्यापक दत्ता पाटील,माजी सरपंच सुरसेन पाटील,प्रकाश देसाई, दिलीप देसाई ,बाजीराव पाटील, बळीराम पाटील, बदाम मगदूम, रंगराव पाटील, कृष्णा धावडे, पिंटू साळुंखे ,राजेंद्र देसाई,अविनाश पाटील, अनिल नलवडे,रंगराव पाटील,राजेंद्र सूर्यवंशी,मेजर कृष्णात देसाई, संयोजक मंडळ उपस्थित होते. पंच म्हणून वसंत पाटील, संदीप पाटील, बाबा शिरगावकर,राहुल सावंत महेश जाधव, गजानन खराडे ,आनंदा गोडसे,अरुण पाटील, आर्या पाटील तानाजी बंडगर,वैभव तेली आदींनी काम पाहिले.निवेदन बापू चौगले यांनी केले.प्रशिक्षक म्हणून तानाजी बंडगर, सागर सादळे व संघ व्यवस्थापक म्हणून सुनील फाटक संजय देबाजे यांची निवड करण्यात आली.








