दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धेत कासार्डेचे महापुरुष ,तर वारकरी भजन स्पर्धेत वेंगुर्लेचे केपादेवी प्रथम; मारुती हरिनाम सप्ताह.
कुडाळ –
.
कुडाळ – बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित संगीत भजन स्पर्धेत तांबोळी – दोडामार्गच्या स्वरधारा भजन मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला.तसेच कासार्डे – कणकवलीच्या श्री महापुरुष भजन मंडळाने प्रथम ,तर जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेत वेंगुर्लेच्या श्री केपादेवी वारकरी भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. या सप्ताहानिमित दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धे यानिमित श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्यावतीने संगीत भजन, दिंडी चक्री वारकरी भजन व वारकरी भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या भजन स्पर्धासह विविध कार्यक्रमाच्या सादरीकरणाने सात दिवस कुडाळ शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. भजन स्पर्धांचा उर्वरित निकाल पुढील प्रमाणे आहे. संगीत भजन स्पर्धा :- द्वितीय – दत्तगुरु मंडळ ( वैभववाडी ),तृतीय – महापुरुष मंडळ (भोगवे ) ,चौथा – कलेश्वर पूर्वीदेवी मंडळ ( वेतये ) ,पाचवा – चिंतामणी मंडळ ( सुरंगपाणी – वेंगुर्ले) उत्तेजनार्थ प्रथम – समाधी पुरुष मंडळ (मळगाव ) ,उत्तेजनार्थ द्वितीय- साई खोडदेश्वर मंडळ ( पिंगुळी ), उत्कृष्ट गायक – विराज तांबे (दत्तकृपा मंडळ, वैभववाडी ), पखवाज – आबा मेस्त्री ( रामकृष्ण हरी महिला भजन सेवा संघ, तेंडोली ), तबला – ओंकार राऊळ (महापुरुष मंडळ, भोगवे ) , हार्मोनिअम – वैभव सावंत ( सद्गुरू संगीत मंडळ ( कुडाळ ), झांज – काव्या पवार ( ब्राम्हण देव महिला मंडळ, पावशी ) उत्कृष्ट कोरस – विठ्ठल रखुमाई मंडळ ( आंदुर्ले ) यांची निवड करण्यात आली.या स्पर्धेत एकूण 32 मंडळांचा सहभाग होता.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शहाबाज शेख ( सावंतवाडी ), संदेश किंजवडेकर ( कुडाळ ) व राजू सावंत ( वर्दे ) यानी काम पाहिले.निवेदन राजा सामंत व वैभव खानोलकर यांनी केले. वारकरी दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धा:द्वितीय – श्री साईकृपा मंडळ, (कासार्डे ), तृतीय – श्री रवळनाथ मंडळ ( राजापूर ) ,चौथा – श्री धारेश्वर मंडळ (कासार्डे ) ,उत्कृष्ट गायक – रणदीप गायकवाड (श्री देव महापुरुष मंडळ, कासार्डे ) , उत्कृष्ट पखवाज – संदिप पवार ( श्री देव महापुरुष मंडळ, कासार्डे ),उत्कृष्ट कोरस – श्री रामेश्वर मंडळ (साळीस्ते ), नृत्य अविष्कार – श्री महापुरुष मंडळ, ( कासार्डे ) यांची निवड करण्यात आली. वारकरी भजन स्पर्धा : द्वितीय श्री वेतोबा मंडळ (कोचरा ),तृतीय – श्री भावई मंडळ (कोचरा ), चौथा – श्री महापुरुष मंडळ (निवती ) ,उत्कृष्ट गायक- महेश झाड ( भावई मंडळ, कोचरा ) , पखवाज – प्रितेश मेतर ( महापुरुष मंडळ, निवती!) ,उत्कृष्ट कोरस – श्री रामेश्वर महिला मंडळ ( वेंगुर्ले),नृत्य अविष्कार – मूळपुरुष धावडेश्वर मंडळ ( वेंगुर्ले ) यांची निवड करण्यात आली.दिंडी चक्री वारकरी भजन व वारकरी भजन या दोन्ही स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून मोहन मेस्त्री ( पांग्रड ) व लक्ष्मण नेवाळकर ( बाव ) यांनी काम पाहिले.निवेदन बादल चौधरी यांनी केले. बक्षीस वितरण अरविंद शिरसाट, मंदार शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, सागर तेली , अभय शिरसाट, प्रसाद धडाम, अमेय शिरसाट, राजेश महाडेश्वर, प्रवीण धडाम , मयुर शिरसाट, चेतन पडते, प्रसाद शिरसाट, संदेश पडते, आबा धडाम , सुमेध साळवी, भूषण मठकर, दिपक भोगटे, सचिन कुडतरकर , परिक्षक शहाबाज शेख ,राजू सावंत, व संदेश किंजवडेकर तसेच कमिटी सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन प्रा.वैभव खानोलकर यांनी केले.









