चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
दक्षिणेतील ‘मिल्की ब्युटी’ तमन्ना भाटिया आता मधूर भांडारकर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला चित्रपट ‘बबली बाउन्सर’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. चित्रपट तीन भाषांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. ‘बबली बाउन्सर’ हिंदीसोबत तमिळ आणि तेलगू भाषेत पहायला मिळणार आहे. या चित्रपटात सौरभ शुक्ला आणि साहिल वैद देखील मुख्य भूमिकांमध्ये आहेत.

हा चित्रपट स्टार स्टुडिओजने निर्माण केला आहे. चित्रपटात तमन्ना एका बाउन्सरची भूमिका साकारत आहे. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ती दिल्ली जाऊ इच्छित असताना आईच्या विरोधाची पार्श्वभूमी यात दिसून येणार आहे. हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
तमन्ना याचबरोबर ‘प्लॅन ए प्लॅन बी’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख नायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तसेच पूनम ढिल्लों या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती रजत अरोरा, त्रिलोक मल्होत्रा अन् के.आर. हरीश यांनी केली आहे.









