हॉरर-थ्रिलर फ्रँचाइजीत झाली सामील
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया अलिकडेच रेड 2 या चित्रपटात दिसुन आली होती. तमन्ना आता एकता कपूरचा सर्वात चर्चित हॉरर-थ्रिलर फ्रँचइजी रागिनी एमएसएस 3 मध्ये दिसून येणार आहे. एकता कपूर रागिनी एमएसएस 3 साठी दीर्घकाळापासून तयारी करत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण चालू वर्षाच्या अखेरीस सुरू होणारा आहे.
तमन्नाने या चित्रपटाची कथा ऐकून याला होकार दर्शविला आहे. चित्रपटात म्युझिक आणि ग्लॅमरचा पैलूही दर्शविण्यात येणार असल्याचे समजते. निर्माते एक असे चार्टबस्टर गीत तयार करण्याच्या प्रयत्ना आहेत, जे पूर्ण देशात गाजेल. 2011 मध्ये प्रदर्शित पहिल्या रागिनी एमएसएसमध्ये राजकुमार राव आणि कॅनाज मोटिवाला मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर 2014 मध्ये रागिनी एमएसएस 2 आला होता, ज्यात सनी लिओनी दिसून आली होती. हा चित्रपटही हिट राहिला आणि याच्या गाण्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता 10 वर्षांनी एकता कपूर या फ्रँचाइजीला पुढे नेण्याची तयारी करत असून तमन्नाला याकरता योग्य कलाकार मानले जात आहे.
तमन्ना सध्या रोमियो या चित्रपटात काम करत असून यात तिच्यासोबत शाहिद कपूर दिसून येणार आहे. तर जॉन अब्राहमसोबत ती एका प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. तर वीवन चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे.









