वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटामंध्ये स्वत:चे स्थान निर्माण केल्यावर तमन्ना भाटिया सध्या ओटीटीवर सक्रीय आहे. तमिळ वेबसीरिजनंतर तमन्नाची पहिली वेबसीरिज चालू महिन्या प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे नाव ‘जी करदा’ असून ती रोमँटिक ड्रामा धाटणीची आहे.
या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सीरिज प्रामुख्याने 7 मित्रांची कहाणी असून जे बालपणापासून एकत्र आहेत. या सीरिजमध्ये उच्च मध्यमवर्गातील प्रेमावरून गोंधळात असलेल्या युवतीची भूमिका तमना साकारत आहे. स्वत:च्या मित्रासोबत 12 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या आणि कुटुंबाच्या दबावानंतर विवाहासाठी तयार झालेल्या युवतीची भूमिका ती साकारणार आहे.

जी करदा हा एक असा अनुभव आहे, जो शब्दांमध्ये व्यक्त करता येऊ शकत नाही. मी मुंबईतील युवती असल्याने अशाप्रकारच्या व्यक्तिरेखेशी स्वत:ला जोडून घेऊ शकते. ही भूमिका साकारताना मी आनंद अनुभवला आहे असे उद्गार तमन्नाने काढले आहेत.
जी करदा या सीरिजची निर्मिती दिनेश विजान यांची कंपनी मॅडॉक एंटरटेन्मेंटकडून करण्यात आली आहे. तर याचे दिग्दर्शन अरुणिमा शर्मा यांनी केले आहे. हुसैन दलाल, अब्बास दलाल यांनी याची कथा लिहिली आहे. जी करदा मध्ये तमन्नासोबत आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, आन्या सिंह, हुसैन दलाल, सायन बॅनर्जी, संवेदना सुवालका हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. जी करदा ही सीरिज 15 जून रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.









