न्हावेली / वार्ताहर
तळवणे वेळवेवाडी पुलाच्या भरावाची माती खचल्याने रस्त्याला धोका निर्माण झाला आहे . शिवाय येथे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती तेथील शिंदे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रशांत कोरगावकर यांनी दिली असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष वेधावा अशी मागणी केली आहे.
तळवणे वेळवेवाडी पुल अलीकडेच नव्याने बांधण्यात आले आहे. या पुलासाठी ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा प्रसंगी आंदोलन केले आहे. मात्र, सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातील मुखावरील भागाला घातलेला मातीचा भराव खचल्याने येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हा भराव खचल्याने रस्त्याला धोका उद्धभवण्याची शक्यता आहे. तरी, वेळीच याकडे प्रशासनाने लक्ष वेधून डागडुजी करावी अशी मागणी श्री कोरगावकर यांनी केली आहे .









