महाशिवरात्रीनिमित्त विविध गावांमध्ये अभिषेक-महाप्रसादाचे आयोजन : शिवमंदिरे दर्शनासाठी भक्तांनी गेली फुलून
वार्ताहर/किणये
तालुक्मयाच्या विविध गावांमधील शिवस्वरूप मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी व गुऊवारी हर हर महादेवाचा गजर झाला. मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती, अभिषेक, हरिपाठ, भजन, प्रवचन, कीर्तन निरुपण, जागर–भजन व महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दर्शनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे शिवमंदिरे भक्तांनी फुलून गेली होती. तालुक्याच्या विविध गावांमध्ये सिद्धेश्वर, कलमेश्वर, रामेश्वर, ब्रम्हलिंग आदी मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये बुधवारी महाशिवरात्रौत्सव साजरा करण्यात आला. मंदिरांना आकर्षक अशी सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या मंदिरांमध्ये अभिषेक ऊद्राभिषेक, वरद शंकर पूजा, महाआरती करण्यात आली तर बव्हुतांशी गावांमध्ये गुऊवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पिरनवाडी
येथील शिवालय मंदिरात (मुक्तिधाम) महाशिवरात्री निमित्त बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभिषेक, होम त्यानंतर आरती करण्यात आली. सायंकाळी भजन व त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
नावगे 
रामलिंग मंदिरात बुधवारी सकाळी नावगे गावचे इनामदार देसाई यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. दिवसभर भजन व इतर कार्यक्रम झाले. सायंकाळी मंदिरात कीर्तन निरूपणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री बारा वाजता ऊद्राभिषेक करण्यात आला. तर ओम नम: शिवाय हा नाम जप करण्यात आला. त्यानंतर जागर भजनाचा कार्यक्रम झाला. नावगे गाव हे नागवेल या डोंगर पायथ्याशी वसलेले आहे. या नागवेल डोंगरामुळेच गावाला नावगे हे नाव देण्यात आले. या गावात रामलिंगेश्वर तीर्थ कुंड आहे. या कुंडात बारा महिने पाणी असते. या पाण्याचा गावातील नागरिक पिण्यासाठी वापर करतात. त्यामुळे या देवस्थानाचा महिमा आघात असा आहे. गुऊवारी सकाळी रामलिंग पिंडीला बुत्ती पूजा करण्यात आली. त्यानंतर रामलिंग तीर्थक्षेत्रावर महिलांनी पडल्या भरण्याचा कार्यक्रम केला. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घेतला.
राकसकोप 
येथील शिवशंकर मार्कंडेय तीर्थक्षेत्र उत्सव मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने भीमसेन टेकडी येथे महाशिवरात्रि उत्सव साजरा करण्यात आला. बुधवार व गुऊवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम भागातील भाविकांनी या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला. बुधवारी सकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. ध्वजारोहण व नंदी पूजन, तुळस पूजन व गणेश पूजन, विणा पूजन व भीमसेन पूजन केले. विविध गावातील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम झाला. गुऊवार दि. 27 रोजी सकाळी सात वाजता अभिषेक करण्यात आला. दहानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठाचा कार्यक्रम झाला. या हरिपाठामध्ये पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला होता. या भीमसेन टेकडीच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गुऊवारी दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
मंडोळी
येथील कलमेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. बुधवारी सकाळी महाभिषेक करण्यात आला. रखुमाई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर अलतगा येथील मुक्ताई महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी कलावती आईचे वाराचे भजन करण्यात आले. सायंकाळी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. गुऊवार दि. 27 रोजी सकाळी जीवन विद्या मिशन शाखा मंडोळी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. सकाळी नऊ वाजता ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ मंडोळी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. या महिलांनी भजन सादर केले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
बहाद्दरवाडी
येथील ब्रह्मलिंग मंदिरात बुधवारी पहाटे काकड आरती करण्यात आली. त्यानंतर दिवसभर भजन व सायंकाळी हरिपाठ असा कार्यक्रम झाला. रात्री अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर जागर भजन असे कार्यक्रम झाले. याचबरोबर गुऊवारी जानेवाडी, बिजगर्णी गावामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.









