दुरुस्ती करून घेण्याकडे दुर्लक्ष : नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात अधिकारी असमर्थ
बेळगाव : विविध उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातही शौचालयांची देखभाल व्हावी या उद्देशाने प्रत्येक तालुक्मयाला सकिंग मशिन उपलब्ध कऊन देण्याचा आदेश राज्य सरकारने 2011-12 मध्ये दिला होता. मात्र या आदेशाची अंमलबजावणी तब्बल आठ वर्षानंतर झाली आहे. दरम्यान 2018 साली जरी मशिन मिळाली असली तरी ती वापराविना पडून आहे. त्यामुळे ती न दिलेलीच बरी, अशी अवस्था निर्माण झाली असून सध्या ती नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान दुरुस्त करून घेण्याकडे अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. याबाबत विचारले असता यासाठी दुरुस्त करणारे भेटत नसल्याचा कांगावा करण्यात येत आहे. सकिंग मशीन वापराविना पडून असल्याने सध्या ती नादुरुस्त झाली आहे. ज्यावेळी राज्य सरकारने ती मशीन दिली होती त्याचवेळी ती वापरात आणली असती तर ती खराब झाली नसती. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाचा फटका नागरिकांनाही सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात सकिंग मशीन हवी असल्यास महानगरपालिकेच्या पाया पडावे लागत आहे. मात्र याचे सोयरसुतक तालुका पंचायत अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत आता गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील चार ते पाच वर्षांपासून ही मशीन तालुका पंचायतसमोर पडून आहे. परिणामी याचा उपयोग जनतेसाठी यावषी तरी करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ही सकिंग मशीन ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. दरम्यान तालुका पंचायतला सकिंग मशीन मिळाली असली तरी ती आता वापराविना पडून आहे. मशीन देण्यात आली मात्र त्यासाठी लागणारा ट्रॅक्टर कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रॅक्टरची समस्या असल्याने मशीन पडून होती, असे साऱ्यांना वाटत होते. मात्र मशीनच नादुरुस्त असल्याने ती कुचकामी ठरली आहे. त्यामुळे यासाठी खर्च करण्यात आलेला सरकारचा निधी वाया गेला आहे. संबंधित मशीन भाडेतत्त्वावर अथवा नवीन ट्रॅक्टर खरेदी कऊन हा प्रश्न निकालात काढला असता तर मशीन नादुरुस्त झालीच नसती. मात्र अधिकाऱ्यांचे काम केवळ सरकारला ख•dयात घालण्याचेच असते, अशी चर्चा सुरू आहे. तालुक्मयाबरोबरच जिह्यातील प्रत्येक तालुका पंचायतला एक सकिंग मशीन देण्यात आली आहे. चार ते पाच वर्षांनंतर एकदाही या मशिनचा वापर करण्यात आला नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. अधिकाधिक तालुक्मयांमध्ये या मशीनचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. तालुका पंचायतचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी या मशिनसाठी मोठे प्रयत्न केले होते. ही मशीन नागरिकांसाठी उपलब्ध व्हावी यासाठी ट्रॅक्टरचीही व्यवस्था करणार होते. मात्र त्यांची बदली झाली आणि आता त्यानंतर ही मशीन पडून आहे. तालुक्मयातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सकिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आली. मात्र ती कूचकामी ठरत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दुरुस्ती झाल्यानंतरच भाडेतत्त्वावर देण्याचा विचार
तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याकडे याबाबत विचारणा केली असता सध्या तरी ही मशीन नादुरुस्त आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती झाल्यानंतरच आपण ती भाडे तत्त्वावर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र याची दुरुस्ती करण्यासाठी मोठा निधी खर्च करावा लागणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून परवानगी घेवून त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-कार्यकारी अधिकारी-राजेश दनवाडकर









