प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या अनेक वर्षांपासून स्वामी विवेकानंद जयंती व पुण्यश्लोक जिजामाता जयंतीदिवशी युवा दिन साजरा करून युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे. येत्या 12 जानेवारीला म. ए. युवा आघाडीच्यावतीने युवा दिन साजरा करण्यात येणार असून त्याला बेळगाव तालुका म. ए. समितीने पाठिंबा दिला आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात रविवारी युवा दिनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनोहर किणेकर होते. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी रामचंद्र मोदगेकर, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर आदींनी विचार व्यक्त केले.
यावेळी सचिव एम. जी. पाटील, लक्ष्मण पाटील, विठ्ठल पाटील, मनोहर संताजी, मनोहर हुंदके, राजू किणयेकर, शंकर कोनेरी, सोमनाथ पाटील, डी. बी. पाटील, पियुष हावळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









