प्रतिनिधी/ बेळगाव
1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्याबाबत चर्चा करण्यात येणार असून तालुक्यातील म. ए. समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रविवार दि. 22 रोजी दुपारी 2 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिज जवळील मराठा मंदिर येथे ही बैठक होणार आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी कळविले आहे.









