► प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दि. 2 रोजी दुपारी 1 वाजता मराठा मंदिर येथे होणार आहे. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.









