वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले कँम्प मैदानावर होणार स्पर्धा
Taluka Level Grand Tennis Ball Cricket Tournament on 15th and 16th April in Vengurle
सिंधुदुर्ग जिल्हयातील गाबीत समाजातर्फे मालवण दांडी येथे दि. २७ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत होणाऱ्या जिल्हास्तरीय गाबीत पर्यटन महोत्सवांअतंर्गत वेंगुर्ले तालुका गाबीत समाजातर्फे वेंगुर्ले तालुकास्तरीय भव्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. १५ व १६ एप्रिल २०२३ कालावदीत वेंगुर्ले कॅम्प येथील सुनिल गावस्कर स्टेडीयम येथे करण्यांत आले आहे या स्पर्धेतून जिल्हास्तरीय गाबीत समाज क्रिकेट स्पर्धेसाठी दोन संघाची निवड करण्यात येणार आहे.या वेंगुर्ले तालुकास्तरीय गाबीत समाज मर्यादित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास रोख रूपये ११,१११ तालुका गाबीत समाजाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचेकडून तर व्दीतीय क्रमांक उपविजेत्या संघास रोख रूपये ७,७७७ तालुका गाबत समाजाचे सचिव किरण कुबल यांचेकडून ठेवण्यांत आलेले आहेत. तसेच अन्य आकर्षक बक्षिसे मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ठ फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यासाठी ठेवण्यात आलेली आहेत.
या स्पर्धेमध्ये गाबीत समाजातील खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. एकूण 16 संघानाच प्रवेश दिला जाणार आहे. हि स्पर्धा 5 षटकांची मर्यादित असून स्पर्धा दोन गटांत बाद फेरीने खेळविली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी संघातील प्रत्येक संघास खेळण्याची वेळ निश्चीत करून दिली जाणार आहे. वेळेत उपलब्द नसणाऱ्या संघाची 15 मिनीटे वेळ वाट वाहून पुढील संघास खेळावयांस दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी टम्प्स व बॉल आयोजकांकडून पुरविण्यात येतील तर बॅट्स संघानी आणावयाच्या आहेत. स्पर्धा दि. 15 रोजी सकाळी 9.30 वाजता उदघाटनानंतर लगेच 10 वाजता सुरु होणार आहे.
या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत गाबीत समाजाच्या खेळाडूंनी आपले गाबीत समाजाचे खेळाडूंना घेऊन क्रिकेट संघ तयार करून सहभाग घ्यावा. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दिलीप गिरप- ९४२३२११९६२ यांचेशी संपर्क साधावा. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी गाबीत समाज बांधव-भगिनींनी तसेच अन्य क्रिकेट प्रेमींनी वेंगुर्ले कॅम्प मैदानावर बहुसंख्ये उपस्थित रहावे असे आवाहन गाबीत समाज वेंगुर्लेचे अध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी केले आहे.









